घुगल वडगावचे इंजिनिअर दांपत्य करते ‘पाहुणचार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:03+5:302021-03-05T04:22:03+5:30

श्रीगोंदा : पुण्याच्या आयटी पार्कमधील नोकरीपेक्षा गावाकडची माणसं आणि व्यवसाय बरा हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून घुगल वडगाव येथील पदवीधर ...

Ghugal Wadgaon engineer couple does 'hospitality' | घुगल वडगावचे इंजिनिअर दांपत्य करते ‘पाहुणचार’

घुगल वडगावचे इंजिनिअर दांपत्य करते ‘पाहुणचार’

Next

श्रीगोंदा : पुण्याच्या आयटी पार्कमधील नोकरीपेक्षा गावाकडची माणसं आणि व्यवसाय बरा हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून घुगल वडगाव येथील पदवीधर इंजिनिअर दांपत्याने थेट गाव गाठले. त्यांनी श्रीगोंदा येथे ‘मायेचे जेवण आणि हक्काचे घर’ असे ब्रीदवाक्य निश्चित करून पाहुणचार भोजनालय सुरू केले आहे. ही जोडी सेवाभावी वृत्तीने या व्यवसायात रमली आहे.

घुगलवडगाव येथील रामदास दादासाहेब ननवरे यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पुण्यात नोकरी सुरू केली. पुण्यातील दत्तात्रय वाघमारे यांची कन्या सारिका हिच्याबरोबर रामदास ननवरे यांचा १ जून २०१३ ला विवाह झाला. विवाहानंतर सारिकाने इंजिनिअरिंग पूर्ण केले.

विवाहानंतर पाच वर्षांनी गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मिरची, वांगी लावली आणि ही शेती दुर्दैवाने तोट्यात गेली. यावर निराश न होता राहुल पोळ यांनी दहा हजारांचे भांडवल दिले आणि त्यांनी भोजनालय सुरू केले .

कोरोना लाॅकडाऊन काळात भोजनालय बंद पडले. मात्र या जोडीने घरी हा व्यवसाय करून शासकीय नोकर व कोरोना योद्धांना डबे पुरविले.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट भोजन देण्याचे काम केले. भोजनालयात दररोज एक प्रेरणादायी सुविचार लिहिला जातो. आता या व्यवसायात इंजिनिअर दांपत्याचा जम बसला

आहे. शहरातील नोकरी सोडून आलेली रामदास-सारिका ही जोडी कष्ट आणि इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी झाली आहे.

-----

मोफत ग्रंथालय सुरू करणार

या व्यवसायातून किती पैसे मिळाले यापेक्षा जीवाभावाची अनेक माणसे भेटली. विद्यार्थ्यांना भोजनाबरोबर ज्ञानाची शिदोरी देण्यासाठी एक छोटे ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, तरुणांसाठी आरोग्यवर्धक ज्यूस, नाष्टा सकाळी सुरू करण्याचा विचार आहे.

-रामदास व सारिका ननवरे

---

०४ भोजनालय

श्रीगोंदा येथील भोजनालय चालविणारे रामदास व सारिका ननवरे.

Web Title: Ghugal Wadgaon engineer couple does 'hospitality'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.