शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

नगर बाजार समितीच्या गेटला पुन्हा कुलूप, शिवसेनेचे ते आंदोलन ठरले औटघटकेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:13 AM

कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे.

अहमदनगर : कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे.

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला दोन गेट आहेत. त्यातील एका गेटचा उपयोग हा बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो. तर दुसऱ्या गेटचा उपयोग बाजार समितीमधून बाहेर पडण्यासाठी केला जातो. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. पण गेल्या १० ऑक्टोबर २०१८ ला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीस अडथळा कारण दाखवत बाजार समितीच्या बाहेर पडण्याचा गेटला कुलूप लावलेले आहे. परिणाम बाजार समितीत येण्यासाठी आणि बाजार समितीतून बाहेर जाण्यासाठी सर्व वाहतुकदारांना एकाच मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्या चौकात वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहतूक कोंडीच जास्त होताना दिसत आहे. या बाजार समितीचे दोन्ही गेट खुले असावेत यासाठी बाजार समितीने ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही गेट खुले करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. पण प्रशासनाने त्यास दाद दिली नाही. मागील महिन्यात शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि इतर शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने त्या गेटचे कुलूप तोडत ते गेट खुले गेले. पण त्यानंतर आठवडाभरातच वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आलेले आहे. शिवसेनेचे गेट खुले करण्याचे आंदोलन औटघटकेचे ठरले आहे. बाजार समितीच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने त्या चौकात पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.

 बाजार समितीमध्ये ये-जा करण्याऱ्या गाड्या आणि शेतकरी यांची संख्या मोठी आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने गेटला कुलूप लावल्याने एकाच गेट वर ताण येऊन चौकात वाहतूक कोंडी वाढत आहे. गेट खुले व्हावे यासाठी जिल्हाधिकारी आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. गेट खुले व्हावे हीच बाजार समिती प्रशासनाची इच्छा आहे, असे बाजार समितीचे सभापती  अभिलाष घिगे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजारTrafficवाहतूक कोंडी