Ganja seized with hard-working car; Both arrested | काष्टीत कारसह गांजा जप्त; दोघांना अटक

काष्टीत कारसह गांजा जप्त; दोघांना अटक

काष्टी : नगर-दौड रोडवर काष्टी शिवारात शुक्रवारी पोलिसांनी एका कारमधून सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा १७ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 
 संजय महादेव पाचपुते (रा.काष्टी), मोजीस रॉबिन राठोड (त्रा.भीमनगर,ता. दौंड. जि.पुणे) अशी गांजा बाळगणाºया आरोपींची नावे आहेत.  दौडवरून काष्टीला गांजाचा मोठा साठा अवैध विक्रीसाठी येत असल्याची खबर पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना समजली होती. त्यावर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहका-यांनी काष्टीतील परिक्रमा कॉलेज गेटसमोर सापळा लावला. पोलिसांनी प्रथम १७ किलो गांजा व स्विफ्ट कार जप्त केली. यानंतर गांजा तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत.

Web Title: Ganja seized with hard-working car; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.