शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद; दरोड्याच्या तयारीत असताना इमापूर घाटातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:53 PM

नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली.

ठळक मुद्देया टोळीत चौघांचा समावेश असून त्यांच्याकडून चाकू, कटावणी, लाकडी दांडे असे हत्यारे जप्त केली आहेत.अभिमान शिवदास पवार (वय २९, रा. वडजी ता. पैठण,), सारस विठ्ठल काळे (वय ३२, रा. राहडगाव ता. पैठण), प्रविण अर्पण भोसले (वय २२, रा. गलांडे देऊळगाव, ता़ श्रीगोंदा) व सिचन रूस्तम चव्हाण (वय २२, रा. निपाणी जळगाव ता. पाथर्डी) असे पकडलेल्या दरोडेखारांची नावे आहेत. नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली.

अहमदनगर : नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली.या टोळीत चौघांचा समावेश असून त्यांच्याकडून चाकू, कटावणी, लाकडी दांडे असे हत्यारे जप्त केली आहेत. अभिमान शिवदास पवार (वय २९, रा. वडजी ता. पैठण,), सारस विठ्ठल काळे (वय ३२, रा. राहडगाव ता. पैठण), प्रविण अर्पण भोसले (वय २२, रा. गलांडे देऊळगाव, ता़ श्रीगोंदा) व सिचन रूस्तम चव्हाण (वय २२, रा. निपाणी जळगाव ता. पाथर्डी) असे पकडलेल्या दरोडेखारांची नावे आहेत. या चोरट्यांनी नगर शहरात तोफखाना हद्दीत विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.चार दरोडेखोर इमामपूर घाटात लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर गुठ्ठे, राजकुमार हिंगोले, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, कास्टेबल सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, फकीर शेख, भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डिले, मनोहर शेजवळ, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, विजयकुमार वेठेकर, सचिन अडबल, विशाल अमृते, विनोद मासाळकर, किरण जाधव, मच्छिंद्र बर्डे, किरण जाधव यांच्या पथकाने मंगळवारी रात्री इमामपूर घाटात सापळा लावून दरोडेखोरांना अटक केली.टोळीतील अभिमान पवार याच्यावर फुलंब्री, करमाड, पैठण, पाचोड, काचोड आदी पोलीस ठाण्यात तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी सारस विठ्ठल काळे याच्यावर पैठण, शेगाव, चिखली, जळगाव आदी ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. नगर शहरात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये या चोरट्यांचा हात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस