Ganesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:19 AM2018-09-24T08:19:03+5:302018-09-24T08:19:34+5:30

गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.

Ganesh Visarjan 2018: Exhibition of nine mandal of immersion procession | Ganesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार 

Ganesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार 

Next

अहमदनगर: गणेश विसर्जनात प्रशासनाने डीजेला बंदी केल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. सहा मंडळांनी प्रवरा संगम येथे जाऊन गणेश मूर्तींचे विसर्जन केले. दरवर्षी 12 पर्यंत चालणारी मिरवणूक यंदा नऊ वाजताच संपली.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी केली होती. मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, असा अट्टहास पोलिसांकडे धरला होता.

पोलिसांनी नकार दिल्याने पंधरापैकी नऊ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला.मिरवणुकीत विशाल गणपती, महालक्ष्मी' कपिलेश्वर दोस्ती, आदिनाथ व आनंद तरुण मंडळ हे सहभागी झाले होते. नवरत्न, समझोता, नीलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ यांनी प्रवरासंगम येथे जाऊन गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सहा मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करत नऊ वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. दरम्यान सावेडी येथील तीन गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

विशाल गणपतीची मिरवणूक लक्षवेधी 
नगर शहराचे ग्रामदैवत  असलेल्या विशाल गणपतीची मिरवणूक यंदाही नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरलि. रविवारी सकाळी ८:३०ला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुजा होऊन गणपतीचे विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.लेझीम ढोलताशांचा गजर आणि फुलांची उधळण.गणराया जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हा मिरवणूक सोहळा रंगला.  सात वाजेच्या दरम्यान विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.

Web Title: Ganesh Visarjan 2018: Exhibition of nine mandal of immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.