मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सेवकासाठी मोफत प्राणायाम शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:22 AM2021-05-25T04:22:49+5:302021-05-25T04:22:49+5:30

कोरोना काळामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवून सुरक्षित राहण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या प्रेरणेने मुळा एज्युकेशन सोसायटीमधील सर्व सेवकांसाठी ...

Free pranayama camp for the servants of Mula Education Society | मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सेवकासाठी मोफत प्राणायाम शिबिर

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सेवकासाठी मोफत प्राणायाम शिबिर

Next

कोरोना काळामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवून सुरक्षित राहण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या प्रेरणेने मुळा एज्युकेशन सोसायटीमधील सर्व सेवकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अहमदनगर शाखेतर्फे 17 ते २० मे २०२१ सायं काळी ५:३० ते ६.३० या वेळेत दररोज १ तासाचे ऑनलाइन निःशुल्क प्राणायाम आणि ध्यान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० महिला आणि १५० शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या शिबिरामध्ये प्राणायाम, ध्यान केल्याने सर्व सेवकांना खूप चांगला अनुभव येत असून फुप्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यास आणि मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत होत आहे. असे अनुभव शिबिरात भाग घेतलेल्या सेवकांनी कथन केले. या शिबिरात प्रशिक्षक म्हणून पद्माकर कुलकर्णी, अशोक लाटे व रोहन भोसले यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिराचा फायदा आपल्या सेवकांना होत आहे, असे मत संस्थेचे सहसचिव व्ही. के. देशमुख आणि प्रशासन अधिकारी अशोकराव तुवर यांनी व्यक्त केले.

Web Title: Free pranayama camp for the servants of Mula Education Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.