Four killed in accident in Gujarat; The dead included three in the city district and one in Aurangabad | गुजरातमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू;  नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबादमधील एकाचा मृतांमध्ये समावेश

गुजरातमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू;  नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबादमधील एकाचा मृतांमध्ये समावेश

लोणी : गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातातराहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबाद येथील एकाचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली.
नंदकिशोर संपत निर्मळ (वय २८) गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय ६३, दोघेही रा.पिंपरी निर्मळ ता.राहाता), प्रवीण सारंगधर शिरसाठ (रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) किशोर रायभान कोल्हे (रा.नांदगाव, जि.औरंगाबाद ) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या चौघांची नावे आहेत.
अपघातात मृत्यू पावलेले हे चौघेही एकमेकांचे नातलग आणि मित्र आहेत.  ते शनिवारी (दि.२२) दुपारी पिंपरी निर्मळ येथून इर्टीका मोटारीने (एम.एच.१७, ए झेड.-४५७) गुजरात येथील कुबेर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. दर्शन आटोपून रविवारी (दि.२३) दुपारी ते परतीच्या प्रवासात असताना   नर्मदा शहरानजीक रस्त्यावर कार व  ट्रकची समोरासमोर धडक झाली. यातच या चौघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा गुजरातमधील राजपिपला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात गुजरातमधील नर्मदा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
 दरम्यान या अपघाताचे बातमी पिंपरी निर्मळ व कोल्हार खुर्द येथे समजताच या दोन्हीही गावात शोककळा पसरली. तर मृताच्या नातेवाईकांनी गुजरातच्या दिशेने धाव घेतली.

Web Title: Four killed in accident in Gujarat; The dead included three in the city district and one in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.