शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करणा-या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 7:20 PM

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. 

ठळक मुद्देकोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली.अमोल सुखदेव खुणे, बाबूराव वामन वाळेकर, गणेश परमेश्वर खुणे व राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील अशी आरोपींची नावे. या चौघांनी १ एप्रिल २०१७ रोजी कोपर्डी खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांच्यावर जिल्हा न्यायालयाच्या आवारात सत्तुराने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला.अमोल सुखदेव खुणे (वय २५ रुई धानोरा, ता. गेवराई, जि. बीड), बाबूराव वामन वाळेकर (वय ३० रा. अंकुशनगर ता. आंबड, जि. जालना), गणेश परमेश्वर खुणे (वय २८ रा. रुई धानोरा, ता. गेवराई, जि. बीड) व राजेंद्र बाळासाहेब जराड पाटील (वय २१ रा. परांडा, ता. आंबड, जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे असून ते चार जण शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या चौघांनी १ एप्रिल २०१७ रोजी कोपर्डी खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांच्यावर जिल्हा न्यायालयाच्या आवारात सत्तुराने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा हल्ला थांबविला होता. यावेळी हल्ला करणा-या आरोपींशी झालेल्या झटापटीत कॉन्स्टेबल रवींद्र टकले हे जखमी झाले होते. या घटनेनंतर सहायक फौजदार विक्रम भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहायक पोलीस कैलास देशमाने यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर हा खटला चालला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. न्यायालयात आरोपीविरोधात युक्ति वाद करताना दिवाणे यांनी सांगितले होते की, चारही आरोपींचा उद्देश हा कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला करण्याचाच होता. या आरोपींनी कोपर्डीतील आरोपींना मारण्याचे कटकारस्थान रचले होते. पोलीस कर्मचा-यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने घटना टळली होती. असे मुद्दे दिवाणे यांनी मांडले होते़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास न्यायालयाने निकाल दिला. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. वाजिद खान व अ‍ॅड. गणेश म्हस्के यांनी खटला लढविला. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चारही अरोपींना शिक्षा ठोठावली.

असे आहे शिक्षेचे स्वरूप

हल्ला करणा-या चारही आरोपींना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे (३०७) कट रचणे (१२० ब), सरकारी कामात अडथळा (३५४) आर्म अ‍ॅक्ट या कलमांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी १० हजार दंड, दंड भरल्यास ६ महिने कैद, २ वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. कोपर्डीच्या आरोपींवर चौघांनी केलेला हल्ला न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. सरकारी पक्षाने हे सीसीटिव्ही फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले़ न्यायालयात आरोपींविरोधात हा पुरावा महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय