श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 03:14 PM2019-10-12T15:14:27+5:302019-10-12T15:20:23+5:30

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला. 

Five councilors, including city president, enter BJP in Shrigondi | श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

googlenewsNext

श्रीगोंदा : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला. 
माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, प्रा.तुकाराम दरेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, बापू गोरे, सुनील जंगले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर पाचपुते यांच्या प्रचारात नागवडे समर्थक सक्रीय झाले आहेत. पोटे दापत्यांबरोबर नगरसेविका सीमा गोरे, संगीता मखरे, राजेंद्र लोखंडे, एस.पी.कोंथिबीरे यांनी भाजपात प्रवेश केला. मनोहर पोटे हे पाचपुते यांचे खंद्दे समर्थक. पण पाचपुते हे आपणास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देणार नाहीय. त्यामुळे शुभांगी पोटे व मनोहर पोटे, सतिश मखरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदी शुभांगी पोटे यांनी भाजपाच्या सुनीता शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पुन्हा मनोहर पोटे व त्यांचे सहकारी भाजपमध्ये परतले आहेत. याप्रवेशामुळे भाजपला आणखी बळ मिळणार आहे. राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून स्वगृही परतलो आहे, असे माजी नगराध्यक्षा मनोहर पोटे यांनी सांगितले. 

Web Title: Five councilors, including city president, enter BJP in Shrigondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.