शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

आधी निरीक्षण मग अ‍ॅक्शन : ईशू सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 12:18 PM

गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : गुन्हेगारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रथम कोणते विषय हातळणे गरजेचे आहे़ याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे़ आधी पूर्णत: निरीक्षण केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़सिंधू म्हणाले नगरचा पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत़ कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधी हा जिल्हा आणि येथील प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे़ बदली होऊन गेलेले पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी येथील गुन्हेगारीविरोधात राबविलेल्या मोहिमा प्रभावी ठरल्या आहेत़अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात काम करण्याचा मानस आहे़ याच अनुशंगाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योग्य त्या सूचना देण्याचे काम सुरू केले असल्याचे सिंधू म्हणाले़पोलीस अधीक्षकांसमोरील आव्हानेअवैध दारू विक्रीअवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायातून दोन वर्षांपूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल येथे दहा जणांना जीव गमवावा लागला होता़ सध्या खेडोपाडी गावठी दारू तयार करून विकली जात आहे़ याकडे उत्पादन शुल्क आणि स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे़ लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम पोलिसांनी आणखी कडक करावी लागणार आहे़वाळूतस्करांची दहशतवाळूतस्करीतून जिल्ह्यात गुंडगिरी फोपावली आहे़ सध्या जिल्ह्यातील एकाही वाळू ठेक्याचा लिलाव झालेला नाही़ वाळूतस्कर मात्र अवैधरीत्या वाळूचा उपसा करून विक्री करत आहेत़ यातून महसूल पथकावर तर कधी ग्रामस्थांवर गुंडांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे़ वाळू वाहतूक करणाºया वाहनांखाली अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे़ महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली तरच जिल्ह्यातील वाळूतस्करीला आळा बसणार आहे़गावठी कट्यांची तस्करीनगर जिल्ह्यात बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्यांची तस्करी होते़ अवघ्या दहा ते पंधरा हजार रुपयांना हे गावठी कट्टे विकले जात आहेत़ केडगाव आणि जामखेड येथील हत्याकांड गावठी कट्याच्या सहाय्यानेच झाले होते़ मध्यंतरी पोलिसांनी हत्यार तस्करीविरोधात व्यापक मोहीम राबविली होती़ ही हत्यार तस्करी मात्र थांबलेली दिसत नाही़हद्दपारीचे अस्त्र वापरावेच लागेललोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ निवडणूक काळात राजकीय गुंडगिरीला उधाण येते़ गावापासून ते शहरापर्यंत राजकीय कारणातून वाद होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ निवडणूक काळात शांतता रहावी, यासाठी रंजनकुमार शर्मा यांनी वापरलेले हद्दपारीचे अस्त्र सिंधू यांनाही वापरावेच लागणार आहे़परप्रांतीय टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखीगेल्या तीन ते चार वर्षांपासून परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत़ गेल्या दोन वर्षांत अनेक परप्रांतीय टोळ्यांनी जिल्ह्यात चोरी, फसवणूक व दरोडे टाकले आहेत़ यातील काही टोळ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ या टोळ्यांचा उपद्र मात्र कमी झालेला नाही़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस