शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

कुकडीच्या आवर्तनावर दोन दिवसात अंतिम निर्णय

By admin | Published: July 02, 2014 12:37 AM

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनासंदर्भात पुणे व नाशिक आयुक्तांचा दोन दिवसात अहवाल मागवून घेऊन कुकडीचे पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनासंदर्भात पुणे व नाशिक आयुक्तांचा दोन दिवसात अहवाल मागवून घेऊन कुकडीचे पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.मंगळवारी दुपारी ३ वाजता मंत्रालयात जलसंपदामंत्री शशीकांत शिंदे यांचे अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीस आ. बबनराव पाचपुते, आ. वल्लभ बेनके, आ. शामल बागल, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, राजेंद्र म्हस्के, सदाअण्णा पाचपुते, अ‍ॅड.विठ्ठलराव काकडे, लक्ष्मण नलगे, ज्ञानदेव मोटे, भूषण बडवे तसेच नगर सोलापूरचे जिल्हाधिकारी, कुकडीचे अधिकारी उपस्थित होते. कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी भूमिका आ.बबनराव पाचपुते व शिवाजीराव नागवडे यांनी मांडली. त्यावर ना.शशिकांत शिंदे यांनी पाणी साठ्याची माहिती घेतली. धरणातील पाणी साठा आयुक्तांच्या ताब्यात आहे. पुणे व नाशिक आयुक्तांचा अहवाल येताच पिण्यासाठी आवर्तन सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. पिंपळगाव जोगे, वडज, डिंबे धरणातील अडीच टीएमसी पाणी येडगावमध्ये सोडल्यानंतर येडगावमधून पिण्यासाठी पाणी सोडणार आहे. पाण्याचे योग्य नियोजनकालवा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत कुकडीचे तीन आर्वन सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन आवर्तने सोडली. पाऊस लांबला म्हणून अडचणी निर्माण झाल्या. १७ जून रोजी दिलेल्या पत्रानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. पिण्यासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा तालुक्यात ३२ लाख, आंबेगाव ४ लाख, शिरूर २२ लाख, कर्जत ४ लाख, पारनेर दोन लाख मे. टन ऊस उभा आहे. श्रीगोंद्याचे वाळवंट झाले असतेतर ३२ लाख मे. टन ऊस उभा राहिला असता का?- बबनराव पाचपुते, आमदार कुकडी पाणीप्रश्नी मुख्यमंत्री झाले गंभीरश्रीगोंदा : कुकडी पाणी प्रश्नावरील ज्वलंत समस्या माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप व राजेंद्र म्हस्के यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गंभीर झाले. कुकडीचे पिण्यासाठी तातडीने आवर्तन सोडू आणि हा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी खास बैठक घेऊ सांगत मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली.शिवाजीराव नागवडे, राहुल जगताप, राजेंद्र म्हस्के, संभाजी देवीकर, भूषण बडवे, ज्ञानदेव मोटे, बंडू धारकर यांनी कुकडी पाीण प्रश्नी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली. शिवाजीराव नागवडे म्हणाले, पुण्यावाले कुकडीचे वारेमाप पाणी वापरतात त्यामुळे नगर जिल्ह्यावर अन्याय होतो. राजेंद्र म्हस्के म्हणाले, माणिकडोह धरणात ३ टीएमसी पाणी वाढविण्यासाठी डिंबे-माणिकडोह बोगदा करण्याची गरज आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आपण लवकरच कुकडीच्या पाणी प्रश्नी विशेष बैठक लावू आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊ. (तालुका प्रतिनिधी)