कोरोना काळात कर्तव्यात कसूर : नगर तालुक्यातील दोन शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:02 PM2021-05-19T16:02:00+5:302021-05-19T16:02:09+5:30

कोरोना काळात कर्तव्यात कसूर करण्याऱ्या दोन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. तहसील विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नगर तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

Fault in duty during Corona: Notice to two teachers in Nagar taluka | कोरोना काळात कर्तव्यात कसूर : नगर तालुक्यातील दोन शिक्षकांना नोटिसा

कोरोना काळात कर्तव्यात कसूर : नगर तालुक्यातील दोन शिक्षकांना नोटिसा

Next

केडगाव : कोरोना काळात कर्तव्यात कसूर करण्याऱ्या दोन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. तहसील विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. नगर तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाकडूनही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. गावातील विलगीकरण कक्षात रूग्णांच्या नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर व लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांकडून कोरोना या जागतिक आपत्ती काळात मोलाचे योगदान मिळत आहे. आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेसोबत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक मोलाची भूमिका बजावत आहेत.

तथापि, ग्रामस्तरावर काही लोक कोरोना काळात नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई तालुका प्रशासनाकडून केली जात आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आठवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक राजेंद्र ढगे, मांडव्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शरद म्हस्के यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.

---

कर्तव्यात कसूर करणारांची गय करणार नाही

कोरोना आपत्तीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य पार पाडावे. यापुढे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून तालुका लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

Web Title: Fault in duty during Corona: Notice to two teachers in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.