शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पंचनामा सुरू असताना शेतक-याने सोयाबीन पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 6:19 PM

एका शेतक-याने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिका-यांसमोरच अवकाळी पावसामुळे मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगा-यास आग लावली.

बेलापूर : एका शेतक-याने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिका-यांसमोरच अवकाळी पावसामुळे मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगा-यास आग लावली. या घटनेमुळे अवकाळीने केलेल्या नुकसानीची प्रचिती येत आहे. बेलापूर खुर्द येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला. आशा रामराव महाडिक व रामराव नारायण महाडिक यांच्या एक एकर शेतात सोयाबीनचे पीक होते. मात्र अवकाळी पावसाने काढणीस आलेले सोयाबीन पूर्णत: भिजून गेले. सोयाबीनला मोड फुटले. सरकारने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेलापूर खुर्द येथील ग्रामसेवक सी.डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, तसेच कोतवाल सुनील बाराहते, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी हे महाडिक यांच्या शेतात पंचनामा करण्याकरीता गेले. सोयाबीनला पूर्णपणे कोंब फुटले असल्याने महाडिक हे हतबल झाले. पंचनाम्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. पंचनाम्याकरीता पिकाची छायाचित्रे, सातबारा उतारा, विमा पावती आदी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही मदत मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे महाडिक यांनी पंचनाम्याकरीता आलेल्या महसूल कर्मचा-यांसमोरच सोयाबीनच्या ढिगा-याला आग लावली.कर्मचारी गोंधळलेमहसूल कर्मचारीही त्यामुळे काही वेळ गोंधळून गेले. तलाठी विकास शिंदे यांनी संबंधित शेतक-याच्या नुकसानीचा पंचनामा करुन कागदपत्रे जमा केल्याचे सांगितले. पावसाने भिजल्यामुळे सोयाबीनला मोड फुटलेले होते अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :belapur-acबेलापूरCrop Insuranceपीक विमा