शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बनावट नवरीला पोलिसांच्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:36 AM

सिन्नर येथील युवकाला ठगविणाऱ्या बनावट नवरी व तिच्या आईला श्रीरामपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

श्रीरामपूर : सिन्नर येथील युवकाला ठगविणाऱ्या बनावट नवरी व तिच्या आईला श्रीरामपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. संगमनेरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच या दोघींच्या मुसक्या आवळल्या. मध्यस्थ मात्र फरार झाला आहे. या टोळीने जळगावसह गुजरातमध्येही अशाच स्वरूपाचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.श्रीरामपुरातील लग्न जुळवणा-या टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला होता. सिन्नर तालुक्यातील किशोर एकनाथ पगार याला या टोळीने फसविले होते. लग्नानंतर दुस-याच दिवशी बनावट नवरी बनलेली प्रियांका व तिची आई अनिता या मध्यस्थासह पसार झाल्या होत्या. शहरातील जाकीर ऊर्फ बाळासाहेब बबन पठारे (रा. दत्तनगर), प्रियांका प्रकाश रोकडे, अनिता प्रकाश रोकडे यांच्यावर रविवारी (दि.१) याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मंगळवारी शिरसगाव परिसरातून संगमनेरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्यांना ताब्यात घेतले. मध्यस्थ जाकीरचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने पगार कुटुंबीयाला ५० हजार रुपयांना फसवले आहे. दरम्यान, राज्यात अन्य ठिकाणी या टोळीने गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.जळगाव, सूरतमध्येही फसवणूक ?पोलीस तपासात प्रियांका हिने आपल्याला जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. सुरत येथेही काही जणांना ठगवल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. प्रियांका हिनेच अन्य राज्यातील पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. त्या दिशेने तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.माहिती सांगितली खोटीप्रियांका प्रकाश रोकडे हिने आपण अनाथ असल्याचे पगार यांना सांगितले होते. तसेच ती बहिण अनिता हिच्यासोबत राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, मंगळवारी (दि़३) पोलीस तपासात अनिता ही प्रियांकाची आई असल्याचे पुढे आले़ प्रियांका हिने तिचे नावही खोटे सांगितले होते. मात्र, रविवारी (दि़ १) त्या श्रीरामपुरात एका नातेवाईकाकडे आल्या असता तिथे तिचे खरे नाव पगारा यांना समजले आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर