प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:22 AM2021-03-27T04:22:29+5:302021-03-27T04:22:29+5:30

संगमनेर : कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आली असून रुग्णसंख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून, नागरिकांनी निष्काळजीपणा ...

Everyone should take care of themselves | प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी

प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी

Next

संगमनेर : कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आली असून रुग्णसंख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक असून, नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी. म्हणजे आपण व आपला परिवार कोरोनापासून सुरक्षित राहील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, मुकुंद देशमुख, डॉ. वसीम शेख, डॉ. सुरेश घोलप, महेश वाव्हळ, आदी उपस्थित होते.

Web Title: Everyone should take care of themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.