उद्योजक हुंडेकरी सुखरूप; अपहरकर्त्यांनी सोडले जालन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 04:02 PM2019-11-18T16:02:59+5:302019-11-18T16:03:58+5:30

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Entrepreneur Hundekari Sukhooproo; The hijackers were released | उद्योजक हुंडेकरी सुखरूप; अपहरकर्त्यांनी सोडले जालन्यात

उद्योजक हुंडेकरी सुखरूप; अपहरकर्त्यांनी सोडले जालन्यात

Next

अहमदनगर: नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  
     हुंडेकरी हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घराबाहेर पडले होते. तेव्हा चार जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लाल रंगाच्या कारमधून त्यांना पळून नेले होते. गुंडांच्या तावडीतून हुंडेकर यांनी स्वत:ला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने विविध ठिकाणी हुंडेकरी यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. त्यांचा तातडीने शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.
हुंडेकरी यांचे अपहरण करणा-या गुंडांनी चेहºयाला मास्क बांधलेले होते. ही घटना कोठला परिसरातील एका महिलेने पाहिली होती. गुंडांनी अपहरणासाठी वापरलेले वाहनही सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले होते. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होता.
दरम्यान, अपहरण झालेल्या हुंडेकरी यांची सुखरुप सुटका झाल्याची माहिती सोमवारी दुपारी नगरला समजली. ज्या चार आरोपींना हुंडेकरी यांची अपहरण केले होते. त्यांनी हुंडेकर यांना जालना येथे सोडून दिले होते. त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येण्यासाठी बसले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या युवकाच्या मोबाईलवरुन घरी संपर्क केला होता. त्यानंतर हुंडेकरी हे बसने नगरला येत असताना त्यांना पोलिसांनी जेऊन टोलनाक्यावर ताब्यात घेतले. 

Web Title: Entrepreneur Hundekari Sukhooproo; The hijackers were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.