सिद्धटेक-भांबोरा शिवरस्त्यावर शेतक-यांचे अतिक्रमण; चार महिन्यापासून रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:11 PM2020-08-09T12:11:56+5:302020-08-09T12:12:59+5:30

भांबोरा (ता. कर्जत ) गावालगतच्या सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांच्या सीमेवरून तेहतीस फूट राखीव शिव रस्ता आहे. हा रस्ता शेतक-यांनी अतिक्रमण करून चार महिन्यापासून रस्ता बंद केला आहे. यामुळे भांबोरा, दुधोडी, बेर्डी या गावातील नागरिकांचा सिद्धटेकशी संपर्क तुटला आहे.

Encroachment of farmers on Siddhatek-Bhambora Shivarastya; Road closed for four months | सिद्धटेक-भांबोरा शिवरस्त्यावर शेतक-यांचे अतिक्रमण; चार महिन्यापासून रस्ता बंद

सिद्धटेक-भांबोरा शिवरस्त्यावर शेतक-यांचे अतिक्रमण; चार महिन्यापासून रस्ता बंद

googlenewsNext

सिद्धटेक : भांबोरा (ता. कर्जत ) गावालगतच्या सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी या गावांच्या सीमेवरून तेहतीस फूट राखीव शिव रस्ता आहे. हा रस्ता शेतक-यांनी अतिक्रमण करून चार महिन्यापासून रस्ता बंद केला आहे. यामुळे भांबोरा, दुधोडी, बेर्डी या गावातील नागरिकांचा सिद्धटेकशी संपर्क तुटला आहे.

 शेतक-यांना खते, बी -बियाणे, कांदा,  फळे, ऊस आदी  शेतमाल वाहतूक ठप्प झाली आहे. ऊस तोड सुरू झाल्यास ऊस कसा बाहेर काढणार? हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाची वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधित रस्ता खुला करण्यासाठी काहीच कार्यवाही होत नाही.

आपत्कालीन स्थितीचे प्रशासनाला गांभीर्य नाही. मोजणी करूनच तेहतीस फूट रस्ता खुला करावा. 
        -अशोक चव्हाण, सरपंच, भांबोरा.

सोमवारी (१० आॅगस्ट)  मंडलाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. 
               -नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत.

Web Title: Encroachment of farmers on Siddhatek-Bhambora Shivarastya; Road closed for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.