राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:12 PM2019-07-17T12:12:21+5:302019-07-17T12:12:27+5:30

राहुरी विधानसभा निवडणुकीचा अखेर डफ वाजला आहे़ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

elections: tanpure comment on kardile | राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका

राहुरीत निवडणुकीचा ‘डफ’ वाजला : प्राजक्त तनपुरेंची कर्डिलेंवर टीका

Next

राहुरी : राहुरी विधानसभा निवडणुकीचा अखेर डफ वाजला आहे़ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ तर तनपुरे यांनी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार टीका करीत निवडणुकीपूर्वीच वातावरणात राजकीय रंग भरला़
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव दुशिंग यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली़ गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला़ तनपुरे यांनी आमदार कर्डिले यांचे नाव घेऊन राहुरीत त्यांनी कोणता प्रकल्प आणला? हे जाहीर करावे, असे आव्हान दिले़ कर्डिले हे केवळ शायनिंग आमदार असून त्यांना साधा ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी का लावता आला नाही? फसवी घोषणा करणाऱ्या आमदार कर्डिले यांनी तहसील कचेरी इमारत व जनावरांच्या दवाखान्याचा प्रश्न का सोडविला नाही? असा सवाल तनपुरे यांनी केला़
मच्छिंद्र सोनवणे, संतोष आघाव, धिरज पानसंबळ, नवाज देशमुख, पंढरीनाथ तनपुरे, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब खुळे आदींची भाषणे झाली़ यावेळी सभापती मनिषा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, निर्मलाताई मालपाणी, प्रभाकर गाडे, रामभाऊ डौले, गंगाधर जाधव, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, निसार सय्यद, अतुल तनपुरे, सुरेश निमसे, प्रकाश भुजाडी, भारत रोकडे, संकेत पाटील, संदीप निकम, भाऊसाहेब चौधरी, केरू पानसरे आदी उपस्थित होते़

कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याची आॅफर स्वीकारणार नाही़ राष्ट्रवादी काँगे्रस हा शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे़ राहुरीतील प्रश्न गेल्या १६ वर्षात सुटलेले नाहीत़ त्यामुळे मतदार सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे़ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठिशी जनता उभी राहील़ -प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष, राहुरी.

Web Title: elections: tanpure comment on kardile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.