Egg gang roasting mines | अंडा गँगचा भु-या खान स्थानबद्ध

अंडा गँगचा भु-या खान स्थानबद्ध

अहमदनगर: मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड अंडा गँगचा सदस्य भु-या उर्फ मुजीब अजीज खान (वय ३०) याच्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे़ 
भु-या खान याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हाणामारी, दंगा, आर्मअ‍ॅक्ट, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलिसांनी एमपीडीएतंर्गत प्रस्ताव पाठविला होता़ एमपीडीएतंर्गत नुकतीच कारवाई झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याचा भु-या खान हा साथीदार आहे़ 
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहायक निरिक्षक प्रविण पाटील, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रविंद्र कर्डिले, किरण जाधव, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

Web Title: Egg gang roasting mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.