During the wedding, three thousand jewels were removed from the wedding ceremony | राहत्यात लग्न समारंभातून तीन लाखांचे दागिने लांबविले
राहत्यात लग्न समारंभातून तीन लाखांचे दागिने लांबविले

राहाता : लग्न संमारंभातून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना राहाता शहरातील कुंदन लॉन येथे ५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 
राहाता पोलिसात मंजुषा नरेद्र कुलकर्णी ( वय ५०, रा.औरागांबाद) या महिलेने फिर्याद दिली आहे. ५ डिसेंबर रोजी राहाता येथे आमच्या नात्यातील लग्नसंभारंभाकरीता कुदंन लॉन या ठिकाणी आले होते. लग्नसंभारंभा दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मी एका खुर्चीवर बसले असताना माझ्या जवळील दोन पर्स होत्या. त्यात १७ तोळे सोने, रोख दहा हजार रुपये असा तीन लाख रुपयांचा ऐवज होता. या पर्स माझी नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या, असे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राहाता पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहे. 

Web Title: During the wedding, three thousand jewels were removed from the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.