Due to bad weather, aviation shut down for two consecutive days; The condition of the devotees | खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग दोन दिवस विमानसेवा बंद; साईभक्तांचे हाल
खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग दोन दिवस विमानसेवा बंद; साईभक्तांचे हाल

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज २८ विमानांची ये-जा असते़ गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचे लँडीग व टेकअप रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्टÑीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली. शुक्रवारीही शिर्डीतून विमानसेवा रद्द ठेवण्यात आल्याने भाविकांचे हाल झाले़ 
सध्या शिर्डी विमानळावरून मुंबई, इंदोर, भोपाळ, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरातून दिवसभरात २८ विमानांचे टेकअप व लँडीग होत असते. गुरूवारी सकाळपासूनच खराब व ढगाळ वातावरणामुळे विमानांना उतरण्यासाठी संकेत मिळत नव्हते. स्पाईस जेट, इंडियन एअर लाईन्स, इंडिगो आदी विमान कंपन्यांनी आपल्या सर्व विमानांची शिडीर्तील उड्डाणे व टेकअप रद्द केली. काही विमाने विमानतळावरून चकरा मारून औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आली़ शुक्रवारी असेच खराब वातावरण राहिल्याने आजची विमानसेवाही विस्कळीत झाली़  दिवाळी सुटीनिमित्त देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात साईदर्शनासाठी येत आहेत. 
 नाईट लँडींग सुविधा नाही
रन-वे वरील व्हिजीबीलीटी वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी अधिक क्षमतेची अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात किंवा पावसाळ्यातही खराब हवामानाचा इतका फटका बसला नव्हता. पण सध्याच्या कमी ढगाळ वातावरणातही व्हिजीबीलीटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी कमी होतील, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: Due to bad weather, aviation shut down for two consecutive days; The condition of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.