शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भंडारादरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ औरंगाबादच्या पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 4:26 PM

भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.

राजूर : भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली.या बाबत येथील पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मयत सुभाष नलावडे (रा. गल्ली नंबर २, कैलास नगर, औरंगाबाद) हे आपली आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, भाचा यांच्या समवेत भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने आज भंडारदरा परिसरात पर्यटकांच्या गदीर्ला उधाण आले होते. भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलमधून गेल्या दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. हा फॉल पाहण्यासाठी हे कुटुंब तेथे आले होते. मयत नलावडे हे अँब्रेला फॉलच्या जवळ आले. येथे असलेल्या मोरीतून वेगाने पाणी बाहेर येत असते, या ठिकाणी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. खाली पडताच प्रवाहा बरोबर फॉलच्या खाली पडले. यात त्यांच्या डोक्यास मार लागल्याने ते जागीच मृत्यू पावले. घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी किशोर तळपे, प्रवीण थोरात घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी सांगितली. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले