शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

व्यापा-याच्या अपहरणप्रकरणी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:09 PM

बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापा-याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी केले. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे.

श्रीरामपूर : बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापा-याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी केले.

बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे. या संशयीताविषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांनी हिरण यांच्या शोधासाठी काही पथके तैनात केली आहेत. बेलापूरबरोबरच श्रीरामपूर शहरातही त्यांनी तपासची चक्रे फिरविली आहेत.

अपहरण केलेल्या हॅनचे श्रीरामपुरातून काही सीसीटीव्हीतील चित्रण मिळते का? याचीही पाहणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही लोकांची चौकशी केल्याची माहिती आहे. व्यापारातील काही वादातून हे अपहरण घडले का? त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

दरम्यान, या घटनेवरून ग्रामस्थांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे. हिरण यांचा तातडीने शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मंगळवारी गावात झालेल्या बैठकीनंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस