Don't choose to change parties - Balasaheb Thorat; Meetings for the promotion of Lahamante | पक्ष बदलणा-यांना निवडून देऊ नका -बाळासाहेब थोरात;  लहामटेंच्या प्रचारार्थ सभा
पक्ष बदलणा-यांना निवडून देऊ नका -बाळासाहेब थोरात;  लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

घारगाव : अनेक वर्षे निवडून देऊन ते पाच, पाच वर्षे पठार भागात फिरकले नाही. साधा त्यांना एक सव्वा लाखाचा बस स्टॉप करता आला नाही. येथून जो पुढे पक्ष सोडील, त्यांना पाच वर्षे निवडून देऊ नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. 
अकोले विधानसभा मतदार संघातील राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील बोटा येथे प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले, पठार भागाने आजवर मंत्री पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. शरद पवारांना दगा देणा-यांचा विचार करु नका. लहामटेंना बळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
अशोक भांगरे म्हणाले, पिचडांनी आजपर्यंत पाण्याच्या नावाने राजकारण केले. आदिवासींना फसवले, अशी टीका भांगरे यांनी केली. 
किरण लहामटे म्हणाले, मुळा बारमाही ही शरद पवारांनी केली आहे. पिंपळगाव खांड ही अजित पवारांची देण आहे. माझ्यासारख्या सामान्य उमेदवारासाठी अमित शहा यांना मतदारसंघात यावे लागले. 
याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, सुभाष पाटील आहेर, विकास शेळके, प्रियांका गडगे, सुरेश वाघ, रमेश काका आहेर, सर्जेराव ढमढेरे, पांडू शेळके, महादू शेळके, इब्राहिम शेख, सुहास आहेर, हनुमंत आहेर, बापू जाध व ग्रामस्थ उपस्थित होते.
 


Web Title: Don't choose to change parties - Balasaheb Thorat; Meetings for the promotion of Lahamante
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.