म्हसणे येथे परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:10 AM2021-01-24T04:10:43+5:302021-01-24T04:10:43+5:30

पळवे : पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने डॉ. विलास काळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा परिवर्तन पॅनलला बहुमत ...

Dominance of the transformation panel at Mhasane | म्हसणे येथे परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

म्हसणे येथे परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

googlenewsNext

पळवे : पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने डॉ. विलास काळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा परिवर्तन पॅनलला बहुमत दिले.

गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसायातून गावाची आरोग्यसेवा करता करता आता ग्रामसेवा करण्याचे व्रतही त्यांनी हाती घेतले आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असे : भास्कर गायकवाड, शिवानी बारहाते, अनिल तरटे, विलास काळे, प्रियांका बागल, गुंड आशा, शुभांगी तरटे.

जातेगावमध्ये आमदार नीलेश लंके यांनी बिनविरोध पॅटर्न राबविला. त्यात ९० टक्के यश आले. मात्र एका जागेवरून घोडे अडकल्याने निवडणूक झाली. त्यात सुभाष ढोरमले यांनी गणेश वाखारे यांचा ९० मतांनी पराभव केला. त्यामुळे सुभाष ढोरमले यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनाने लंके पॅटर्नप्रमाणे सुरुवातीस तीन उमेदवार घेऊन दोन वर्षे सरपंचपद स्वीकारणे व नंतरचे तीन वर्षे विठ्ठल पोटघन यांनी चार सदस्य (बिनविरोध) घेऊन गावकारभाराची सत्ता स्थापन करायची, असे ठरले आहे.

फोटो ओळ... २३ म्हसणे

म्हसणे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाल्याने जल्लोष करताना सदस्य.

Web Title: Dominance of the transformation panel at Mhasane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.