शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

रस्ते खराब झाल्याने देवळाली प्रवरा ग्रामस्थांनी रोखली वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 7:25 PM

देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक रोखली.

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक रोखली.देवळाली प्रवरा हद्दीतून करण्यात येऊ नये, ही वाहतूक बंद करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. वाळू वाहतूक सुरु राहिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला.नगराध्यक्ष कदम यांच्यासह नागरिकांनी वाळू वाहतुकीची वाहने अडविल्यानंतर महसूल व पोलिस खात्याची धावपळ उडाली. काही काळासाठी मोठी पोलीस गाडीसह मोठा पोलीस फौजफाटा देवळालीत दाखल झाला होता. अडवलेली वाहने आहे त्याच मार्गाने निघून गेली. महसूल खात्याचे कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी भेट देऊन नागरिकांचे निवेदन स्वीकारले. वाळू वाहतुकीस पर्यायी रस्ता वापरण्यास सांगण्यात येईल, असे आश्वासन पाखरे यांनी नागरिकांना दिले.यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, भारत शेटे, आदिनाथ कराळे, अमोल कदम, शिवाजी मुसमाडे, सुधीर टिक्कल, संदीप कदम, राजेंद्र कदम, सूर्यकांत कदम, अतुल कदम, मंजाबापू वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, सचिन सांबारे, भाऊसाहेब गडाख, अमोल वाळुंज, रितेश कदम, रमेश वाळुंज, सागर गडाख, विलास वाळुंज, बाळासाहेब कदम, युनूस शेख, भाऊसाहेब पंडित, प्रकाश कदम, किशोर गडाख, भाऊसाहेब कदम, मंजाबापू कदम, हुसेन शेख, सचिन कदम, मंगेश ढुस, ऋषिकेश उंडे, संदीप कदम, अक्षय कदम, संदीप गडाख, शशिकांत मुसमाडे आदिसह परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी