प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविली जिल्हाधिका-यांच्या सूचना : माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश, वृत्तपत्रविक्रेत्यांना देणार ओळखपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:39 AM2020-03-31T09:39:11+5:302020-03-31T09:39:59+5:30

कोरोना विषाणूचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्याच्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

Deadline for restraining order extended to April 1 | प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविली जिल्हाधिका-यांच्या सूचना : माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश, वृत्तपत्रविक्रेत्यांना देणार ओळखपत्र

प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविली जिल्हाधिका-यांच्या सूचना : माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश, वृत्तपत्रविक्रेत्यांना देणार ओळखपत्र

Next

अहमदनगर : कोरोना विषाणूचा  प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्याच्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. माध्यमांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत असल्याने वृत्तपत्रसेवा सुरू राहणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत.
जिल्हा महसूलस्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे,  रेंगाळणे असे कृत्य करण्यास जिल्हाधिकाºयांनी २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. तेच आदेश आता १४ एप्रिलपर्यंत वाढवले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा,  कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग,  बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व विदेशी सहली यांना या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. कार्यक्षेत्रात असणारी दुकाने सेवा आस्थापना, उपहारगृह, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग  कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब-पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, खासगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.
....यांना आदेशातून सूट
शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, बँक, एटीएम, विमा सेवा, अत्यावश्यक सेवांमधील व्यक्ती,  रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने, रूग्णवाहिका, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध दुग्धोत्पादने , फळे व भाजीपाला, औषधालय, गॅस वितरण सेवा, पेट्रोल पंप (पेट्रोल सकाळी ५ ते ९/ डिझेल विक्री सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत),  जीवनावश्यक वस्तू, विक्री वितरीत व वाहतूक करण्यास परवानगी राहील. प्रसारमाध्यमांची कार्यालये (सर्व  प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टी व्ही, न्यूज चॅनेल), दूरसंचार, पोस्ट व इंटरनेट सेवा पुरविणाºया आस्थापना, चिक्स, चिकण व अंडी दुकाने, जनावरांचे खाद्य-खुराक, पेंड विक्री दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतूक सेवा चालू राहील.

Web Title: Deadline for restraining order extended to April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.