गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:55 AM2023-05-01T10:55:14+5:302023-05-01T10:55:45+5:30
गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.
अहमदनगर - दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. त्याला मुख्य कारण म्हणजे शेताची मशागत करताना शेतकरी बांध पेटवून देतात तसेच रस्त्याने जाणारे वाटसरु किंवा वाहनांच्या सायल्न्ससर मधून ठिणगी पडून मोठ्या प्रमाणात वणवे लागून नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. हे रोखण्यासाठी गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.
रविवारी नगर तालुक्यातील हिवरे बाजार शेजारील गावांतील शेतक-यांनी शेतातील बांध पेटविल्याने गिरीमहाराज मंदिर परिसरातील जंगलाला आग लागली.वनक्षेत्रालाआग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामवन समिति हिवरे बाजार व वणवा प्रतिबंधक पथक हिवरे बाजार व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीत मोर,हरणे, ससे, रानडुकरे, लांडगे व इतर वन्यजीव आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. मानवी भविष्यासाठी वनांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वणवे आटोक्यात आणण्यासाठी गावोगावी स्व्यंप्रेरनेने वणवा प्रतीबंधक पथके तयार करावीत. असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.