Coronavirus: लॉकडाऊनमुळे बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:18 AM2021-05-24T08:18:20+5:302021-05-24T08:20:00+5:30

Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडी बाजार यामुळे बहुरूपींच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Coronavirus: Lockdown causes famine in Bahuroopi society, waiting for government help | Coronavirus: लॉकडाऊनमुळे बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची प्रतीक्षा

Coronavirus: लॉकडाऊनमुळे बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची प्रतीक्षा

googlenewsNext

- योगेश गुंड
केडगाव (नगर) - ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता गावोगावी भ्रमंती करून सोंग घेऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरूपी समाजावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पालातच बसून रहावे लागत असून, त्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा आहे.
जेऊर येथे नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातून १३ कुटुंबे उपजीविकेसाठी वास्तव्यास आली आहेत. पाल टाकून हे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्य करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडी बाजार यामुळे बहुरूपींच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये याच कुटुंबीयांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व किराण्याची मोठी मदत केली होती. परंतु, यंदा मात्र त्यांना मदतीची अद्याप प्रतीक्षा आहे. या कुटुंबीयांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून किराणा व इतर मदत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सविता लांडे तसेच सरपंच राजश्री मगर यांनी दिली आहे. 

नकला केल्यानंतर लोकांकडून अन्नधान्य तसेच काही पैसे मिळतात. त्यावर कुटुंबाची उपजीविका चालते. परंतु, लॉकडाऊनमुळे जीवनाची घडी विस्कटली आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
-सुनील शिंदे, बहुरूपी कलाकार, जेऊर
 

Web Title: Coronavirus: Lockdown causes famine in Bahuroopi society, waiting for government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.