Coronavirus : कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर सील : नगरपरिषदेने केली तात्काळ फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:22 AM2020-04-11T10:22:48+5:302020-04-11T10:23:24+5:30

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात ५५ वर्षाची महिला कोरोना संक्रमित आढळल्याने शुक्रवारी रात्री पोलीस प्रशासनाने लक्ष्मीनगर परिसर सील केला.

Coronavirus: Lakshminagar area seal in Kopargaon: Municipal council has immediate spraying | Coronavirus : कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर सील : नगरपरिषदेने केली तात्काळ फवारणी

Coronavirus : कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर सील : नगरपरिषदेने केली तात्काळ फवारणी

Next

कोपरगाव : कोरोनाबाधित रुग्ण कोपरगाव शहरात सापडल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे. कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात ५५ वर्षाची महिला कोरोना संक्रमित आढळल्याने शुक्रवारी रात्री पोलीस प्रशासनाने लक्ष्मीनगर परिसर सील केला.

या परिसरातील एकही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही. शहरातील इतर उपनगरातील नागरिकांनी कोपरगाव शहराच्या बाहेर न पडण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. नगरपरीषदेच्या वतीने संपूर्ण लक्ष्मीनगर परिसरात जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष्मीनगर परिसरात महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची रात्री उशीरापर्यंत माहिती घेत होते.

Web Title: Coronavirus: Lakshminagar area seal in Kopargaon: Municipal council has immediate spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.