शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

साईनगरीत कोरोनाचा शिरकाव : शिर्डी चौदा दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 7:23 PM

कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

शिर्डी : कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.शिर्डी व निमगावमधील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या सातवर पोहचली आहे. या महिलेच्या संपर्कातील २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका भाजी विक्रेती महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेने शिर्डीतील संस्थान रूग्णालयात उपचार घेतले होते. शिर्डीतील एका नातेवाईकाच्या घरीही तिचे वास्तव्य होते. या महिलेच्या निमगावातील कुटूंबासह सर्वांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेच्या कुटूंबातील अन्य पाचजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. या महिलेची सून लहान मुलीसह शिर्डीतील नातेवाईकाकडे दोन ते तीन दिवसांपासून राहात होती. शुक्रवारी सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र लहान मुलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर आज शिर्डीतील महिलेचा अहवालही पॉझिटीव्ह आला.प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमने सायंकाळी तातडीची बैठक आयोजित केली आहे.पुढील चौदा दिवस या महिलेच्या घराचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व व्यवहार व नागरीकांचा वावर बंद राहील. या बाजुचा परिसर बफर झोन असेल. या भागात झोन जाहीर करण्यात येणार आहे. या बफर झोनमध्येही चौदा दिवस ठराविक वेळत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय