शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

जिल्ह्यातील १ हजार ५९६ गावांतील सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:44 PM

शेतक-यांसाठी, तसेच इतर स्थावर मालमत्ताधारकांसाठी सात-बारा उता-याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यात खाडाखोड किंवा बदल होऊ नये, तसेच हा उतारा त्वरित मिळाला म्हणून शासनाने सात-बारा उता-यांचे संगणकीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार नगर जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के संगणकीकरणाचे काम झाले आहे.

ठळक मुद्दे सात-बारा मिळणार आॅनलाईनचनाशिक विभागात नगर आघाडीवर

अहमदनगर : शेतक-यांसाठी, तसेच इतर स्थावर मालमत्ताधारकांसाठी सात-बारा उता-याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यात खाडाखोड किंवा बदल होऊ नये, तसेच हा उतारा त्वरित मिळाला म्हणून शासनाने सात-बारा उता-यांचे संगणकीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार नगर जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के संगणकीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे यापुढे आता सर्वांना आॅनलाईन सात-बारा उतारे मिळणार आहेत. नाशिक विभागात नगर जिल्हा या कामात आघाडीवर आहे.जिल्ह्यात एकूण १ हजार ६०२ गावे असून त्यापैकी १ हजार ५९६ गावांतील सात-बारा उताºयांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आॅनलाईन सात-बारामध्ये जिल्हा नाशिक विभागात सर्वांत पुढे आहे. जिल्ह्यातील केवळ सहा गावे यात मागे राहिली आहेत. येत्या पंधरा दिवसांत या गावांतही हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून आॅनलाईन सात-बारा तयार करण्याचे काम सुरू होते. प्रत्येक गावात ग्रामसभा, चावडी वाचन, सात-बारा अद्यवतीकरण, ग्रामस्थांच्या शंका, त्यानुसार उता-यात दुरूस्ती आदी कामे तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर पूर्ण केली आहेत.त्यामुळे नगर, अकोले, कर्जत, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा या आठ तालुक्यांत सात-बारा संगणकीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ कोपरगाव, जामखेड, राहाता, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर या सहा तालुक्यांतील प्रत्येकी एक गाव संगणकीकृत करण्याचे राहिले आहे.आॅनलाईन सातबारामुळे प्रशासन गतिमान होणार असून कामात पारदर्शकता येणार आहे. आॅनलाईन उता-यामध्ये आता तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही. बदल करण्यासाठी मात्र तहसीलदारांची परवानगी आवश्यक राहणार आहे. आतापर्यंत एकूण १२ लाख ५४ हजार ७७१ सातबारा उतारे संगणकीकृत झाले आहेत.तालुकानिहाय आॅनलाईन गावांची संख्यानगर १२०, अकोले १९१, कर्जत ११८, कोपरगाव ७८, जामखेड ८६, नेवासा १२७, पाथर्डी १३७, पारनेर १३१, राहाता ६०, राहुरी ९६, शेवगाव ११२, श्रीगोंदा ११५, श्रीरामपूर ५५, संगमनेर १७०.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी