विलगीकरण कक्षात राहत नसल्याची तक्रार; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:49 AM2020-05-12T11:49:58+5:302020-05-12T11:50:31+5:30

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील विलगीकरण कक्षात न राहणा-या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर सहा जण दुस-या राज्यातून व मुंबई येथून गावात आले आहेत.

Complaint of not living in a separation room; Charges filed against six persons | विलगीकरण कक्षात राहत नसल्याची तक्रार; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल 

विलगीकरण कक्षात राहत नसल्याची तक्रार; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल 

Next

कोतूळ  : अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील विलगीकरण कक्षात न राहणा-या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर सहा जण दुस-या राज्यातून व मुंबई येथून गावात आले आहेत. यामुळे त्यांना ग्रामप्रशासनाने विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु तरीही ते गावभर फिरत आहेत. या कारणावरुन ग्रामसेवकांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
 ब्राह्मणवाडा येथे कोवीड संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत व प्रशासनाने येथील विद्यालयात विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. असे असताना गुजरात व मुंबई येथून गावात आलेले तना शौकत पटेल, प्रदीप भाऊ आरोटे, रेखा प्रदीप आरोटे, चांगुणा दत्तात्रय आरोटे, अशोक बारकू फलके, उज्ज्वला अशोक फलके यांना बाहेरून आल्यामुळे विलगीकरण कक्षात राहण्याची सूचना ग्रामप्रशासनाने दिली होती. हा आदेश डावलून ते सर्व लोकांमध्ये फिरत होते. याबाबत गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. यामुळे ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले यांनी भेट देऊन सहा जणांविरुध्द पुढील कारवाई केली आहे. 

Web Title: Complaint of not living in a separation room; Charges filed against six persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.