निवडणुकीत दारू विक्रीवरही आयोगाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:17 PM2019-09-29T12:17:18+5:302019-09-29T12:18:33+5:30

निवडणूक काळात परमिट रूम व दारू विक्री दुकानांवर कडक निर्बंध आणण्यात येणार आहेत. दररोज रात्री दिवसभरच्या दारू विक्रीचा हिशोब द्यावे लागणार आहे.

The Commission also looks at the sale of alcohol in elections | निवडणुकीत दारू विक्रीवरही आयोगाची नजर

निवडणुकीत दारू विक्रीवरही आयोगाची नजर

Next

संडे विशेष-विनोद गोळे ।   
पारनेर : निवडणूक काळात परमिट रूम व दारू विक्री दुकानांवर कडक निर्बंध आणण्यात येणार आहेत. दररोज रात्री दिवसभरच्या दारू विक्रीचा हिशोब द्यावे लागणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी आचारसंहिता कडक करण्यात आली आहे. राज्यातील परमिट रूमधारक, हॉटेल मालक, ढाबे यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पारनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर व नगर तालुक्यातील दारू विक्रेते, परमिट रूम चालक, हॉटेल मालक यांच्या बैठका घेतल्या आहेत.
काय  आहेत नियम..
दारू विक्रेते, हॉटेल, परमीट रूम यांना रात्री अकरा वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवता येतील. दररोज होणारी दारू विक्रीचा हिशोब रात्री १०.३० ते ११ यावेळेस देणे बंधनकारक. रात्री अकरा नंतर हॉटेल सुरू ठेवणे, दारू विक्री केल्यास आचारसंहिता भंग गुन्हा दाखल होणार.
निवडणूक काळात अवैध दारू विक्री करणाºयांवर कारवाईच्या सुचना पोलीस व उत्पादन शुल्क विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री अकरा नंतर हॉटेल, दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे पारनेर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले. 
 

Web Title: The Commission also looks at the sale of alcohol in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.