शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

दावण्या, करपा रोगाने द्राक्ष उत्पादक संकटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 4:26 PM

दावण्या, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे नान्नज परिसरातील द्राक्ष बागा सोडून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. यामध्ये शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

सत्तार शेख ।  हळगाव : दावण्या, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे नान्नज परिसरातील द्राक्ष बागा सोडून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. यामध्ये शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रोगामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करून नुुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.नान्नज येथे जवळपास ४५ हेक्टर द्राक्ष लागवड झालेली आहे. जामखेड तालुक्यात नान्नज परिसरात सर्वाधिक द्राक्ष लागवड आहे. याशिवाय हळगाव, पोतेवाडी येथेही अल्प प्रमाणात द्राक्ष लागवड झालेली आहे. मागील वर्षीच्या भीषण दुष्काळात शेतक-यांनी टॅँकरच्या पाण्यावर द्राक्ष बागा जगविल्या आहेत.  परतीचा पाऊस झाला. मात्र त्याने द्राक्षाचे मोठे नुकसान केले. नान्नज येथील मोहळकरवस्ती व उरेवस्ती या भागातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले. मात्र भरपाई मिळालेली नाही. दरम्यान, नान्नज भागातील द्राक्ष बागांवर दावण्या, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोगाबरोबरच कळी गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलो-याच्या अवस्थेत प्रामुख्याने दावण्या रोगाला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जाऊ लागले आहेत. दावण्याच्या प्रादुर्भावाने फुलोºयातील घड तत्काळ कुजू लागले आहेत. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. द्राक्ष बागांवर झालेला भरमसाठ खर्च अन् मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत राहिल. दावण्या व करपा रोगामुळे नान्नज येथील रामभाऊ मारूती मोहळकर (दोन एकर), दत्तु श्रीपती मोहळकर, गोरख निवृत्ती मोहळकर, श्रीमंत महादेव पोते (पोतेवाडी), भाऊराव विठोबा मोहळकर, दत्तु सोनबा मोहळकर (प्रत्येकी एक एकर), गोरख सोपान मोहळकर (पाऊण एकर), सुभाष किसन मोहळकर (अर्धा एकर) आदी शेतक-यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता द्राक्ष बागा दावण्या व करपा रोगाला बळी पडल्या आहेत. माझ्यासह अनेक शेतक-यांना यंंदा बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे नान्नज द्राक्ष उत्पादक दिलीप मोहळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा