शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

हातगाव परिसरात चोरट्यांच्या मारहाणीत चौघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:50 PM

शेवगाव तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

शेवगाव : तालुक्यातील हातगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून शेतात वस्ती करून राहणा-या दोघांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटे साधारण दोनच्या सुमारास ही घटना घडली.जखमींमध्ये देविदास साहेबराव गादे (वय ४९), सिंधूबाई कुंडलिक शेंडे (वय ५५), दत्तात्रय बापूसाहेब बर्गे (वय ५०), मंदाबाई दत्तात्रय बर्गे (वय ४५) यांचा समावेश आहे. हातगाव शिवारातील मुंगी कॅनॉल जवळील ९ नंबर चारी परिसरात गादे व बर्गे वस्ती आहे. चोरट्यांनी घराबाहेर झोपलेल्या या चौघांना लाकडी दांडके व गजाने मारहाण करून जखमी केले. यावेळी चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल संच व रोख रक्कम असा जवळपास ८२ हजार किंमतीचा ऐवज लांबविला. तसेच देविदास गादे यांच्या मुलाला कोंडून जखमी केले.शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पोलिसांना तपासाच्यादृष्टीने सूचना दिल्या. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख घनश्याम पाटील, पोलीस उपधीक्षक गृह जगताप यांनीही घटनास्थळास भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्याने पिंगेवाडी पुलापर्यंत माग दाखविला. याबाबत देविदास गादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ओमासे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव