20 मे पासुन कुकडीचे आवर्तन; प्रशांत औटींनी याचिका घेतली मागे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 03:30 PM2021-05-17T15:30:53+5:302021-05-17T15:34:39+5:30

श्रीगोदा :  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात  प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली आहे.  त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chicken rotation from May 20; Prashant Auti withdrew the petition | 20 मे पासुन कुकडीचे आवर्तन; प्रशांत औटींनी याचिका घेतली मागे 

20 मे पासुन कुकडीचे आवर्तन; प्रशांत औटींनी याचिका घेतली मागे 

Next

श्रीगोंदाश्रीगोंदा :  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात  प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली आहे.  त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुकडीचे येडगाव धरणातून 20 मे ला आवर्तन सोडण्यात येणार आहे.  समजलेली अधिक माहिती अशी की,  दि. 9 मे पासून कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार होते. त्यावर आठ माही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दि. 7 मे रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्यावर स्थगिती दिली. दि 12 मे ला सुनावणी ठेवली.  दि 11 ला आ. बबनराव पाचपुते,  आ. रोहीत पवार, आ.  अतुल बेनके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रशांत औटी यांनी याचिका मागे घ्यावी म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विनंती केली केली.  त्यावर राहुल जगताप  घनश्याम शेलार,  आण्णासाहेब शेलार, मारुती भापकर,  बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के,  अनुराधा नागवडे,  विलास काकडे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. परंतु प्रशांत औटी यांनी दुसऱ्या दिवशी न्यायालयात यू टर्न मारला. न्यायालयाने पुन्हा 17 मे ला सुनावणी ठेवली. त्यावर आ. रोहीत पवार,  माजी आमदार राहुल जगताप,  घनश्याम शेलार,  आण्णासाहेब शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि पुन्हा प्रशांत औटीची मनधरणी केली.  अखेर प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली.  त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.  जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  20 मे ला आवर्तन सोडण्यात येणार आहे.

Web Title: Chicken rotation from May 20; Prashant Auti withdrew the petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.