चहावाल्याची पत्नी झाली पारेवाडीची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:19+5:302021-02-15T04:20:19+5:30

तीसगाव : तीन पंचवार्षिक कालखंडापासून बिनविरोधची परंपरा खंडित होऊन यावर्षी रंगतदार निवडणूक झालेल्या निर्मलग्राम पारेवाडी (ता. पाथर्डी) येथे तरुणाईने ...

Chahwala's wife became the Sarpanch of Parewadi | चहावाल्याची पत्नी झाली पारेवाडीची सरपंच

चहावाल्याची पत्नी झाली पारेवाडीची सरपंच

Next

तीसगाव : तीन पंचवार्षिक कालखंडापासून बिनविरोधची परंपरा खंडित होऊन यावर्षी रंगतदार निवडणूक झालेल्या निर्मलग्राम पारेवाडी (ता. पाथर्डी) येथे तरुणाईने सत्तांतर घडविले. सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये एकाच गटाचे सर्व सदस्य निवडून आले. त्यामुळे सर्वांनाच अप्रत्यक्षरीत्या सरपंचपदाचे डोहाळे लागले होते. त्यामुळे वाद नको म्हणून चिठ्ठी टाकून सरपंचपदाची निवड झाली. त्यामध्ये तीसगाव शहरात चहाची टपरी चालवीत असलेल्या महादेव तनपुरे यांच्या पत्नी आसराबाई तनपुरे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी बाळासाहेब विश्वनाथ आठरे यांची वर्णी लागली.

गेली पंधरा वर्षे सरपंचपदाची धुरा वाहत गाव निर्मलग्राम करणाऱ्या गटाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तीसगाव परिसरात तो एक मोठा चर्चेचा विषय ठरला. या विषयाची चर्चा थांबते न थांबते तोच आता तीसगाव शहरातीलच चहावाल्याची कारभारीणच गावची सरपंच झाल्याने पुन्हा खुमासदार चर्चेचे फड रंगत आहे. नव्याने सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्यांमध्ये अंतर्गत कलह होऊ नये यासाठी चिठ्ठीने निवडीचा नवा फंडा अवलंबिण्यात आला. सुवर्णा योगेश आठरे, मनीषा गणेश लवांडे, अशोक दिनकर आठरे, राहुल बाळासाहेब भोसले, सुनीता मिनिनाथ लवांडे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह भाऊसाहेब आठरे, सेवा संस्था अध्यक्ष संदीप बर्डे, अमोल आठरे, शशिकांत आठरे, विशाल लवांडे, नीलेश लवांडे, रंजन लवांडे उपस्थित होते.

फोटो : १४ आसराबाई तनपुरे, १४ बाळासाहेब आठरे

Web Title: Chahwala's wife became the Sarpanch of Parewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.