वृक्षतोड करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:14 AM2021-06-23T04:14:36+5:302021-06-23T04:14:36+5:30

माणिकदौंडी : गर्भगिरीच्या डोंगररांगात झालेल्या बेकायदा वृक्षतोडप्रकरणी वन विभागाकडून केळवंडी येथील दोघांविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

A case has been registered against the logger | वृक्षतोड करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

वृक्षतोड करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

Next

माणिकदौंडी : गर्भगिरीच्या डोंगररांगात झालेल्या बेकायदा वृक्षतोडप्रकरणी वन विभागाकडून केळवंडी येथील दोघांविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वनरक्षक एन.डी. दराडे यांनी फिर्याद दिल्याने अखेर निसर्गप्रेमींच्या लढ्याला यश आले.

बेकायदा वृक्षतोड प्रकरणाची जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी गंभीर दखल घेतली आहे. माने यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा मोबाइल स्कॉडने गर्भगिरीच्या डोंगररांगांची कसून तपासणी केली. वनक्षेत्रपाल तथा पथकप्रमुख सुनील भोगे यांच्या नेतृत्वाखाली दोन टीमने गर्भगिरीच्या डोंगररांगांत फिरून तोडलेल्या झाडांच्या बुंध्यांचे मोजमाप केले. सोमवारी सकाळीच पथक पाथर्डीत दाखल झाले होते. पाथर्डी वनक्षेत्रपाल कार्यालयात भोगे यांनी बैठक घेऊन तोडलेल्या झाडांच्या शोधमोहिमेचे नियोजन केले. यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या. माणिक दौंडीच्या घाटापासून पूर्वीकडील डोंगर व पश्चिमेकडील डोंगर, अशा दोन भागांत विभागणी करून टीमला जबाबदारी सोपविण्यात आली. पश्चिमेकडील टीममध्ये स्वतः भोगे सहभागी झाले होते. तोडलेल्या बुंध्यांच्या मोजमापाची रजिस्टरला नोंद करून पथकाकडून फोटो घेतले गेले. तोडलेल्या झाडांच्या बुंध्यांना रंग देऊन खुणा केल्या जात आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने संपूर्ण डोंगर परिसराची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सविस्तर अहवाल जिल्हा उपवनसंरक्षकाना सादर करण्यात येणार आहे. संपूर्ण चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे भोगे यांनी सांगितले. भोगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात वनपाल ए.एस. सूर्यवंशी, वनपाल राजेंद्र आलाट, वनपाल घनवट, वनरक्षक बी.एस. वाडेकर, नारायण दराडे यांच्यासह सुमारे १५ कर्मचारी सहभागी झाले होते.

...........

२२ माणिकदौंडी

वृक्षतोड झालेल्या भागात पाहणी करताना अधिकारी व निसर्गप्रेमी. (छायाचित्र : संदीप शेवाळे)

Web Title: A case has been registered against the logger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.