शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून जमीन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:25 AM

शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून निघोजमध्ये सव्वा चार गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुद्रांक

निघोज : शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडून निघोजमध्ये सव्वा चार गुंठे जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निघोज (ता.पारनेर) येथील शिवा महादू फुलमाळी याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारनेरचे दुय्यम निबंधक के. ई. निमसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निघोज येथील गट क्रमांक ९४० मध्ये आरोपी शिवा महादू फुलमाळी याने घर बांधणीसाठी दस्त क्रमांक ३६२८/२०१४ नुसार खरेदीखत केले. त्यासोबत शेतकरी पुरावा म्हणून जोडलेला गट क्रमांक २३२२ चा स्वत:च्या नावाचा बनावट सातबारा तयार करून नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ (अ) व (ब) चा भंग केला. त्यामुळे फुलमाळी याच्याविरूद्ध नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८३ नुसार कारवाई करण्यात यावी, असा आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एल. पाटील यांनी पारनेरच्या दुय्यम निबंधकांना दिला होता. निघोज येथील पवन परशुराम सातपुते यांच्या तक्रारीनंतर हे खरेदीखत बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुय्यम निबंधकांनी या खरेदी खताचे फेरफार रद्द केले. मात्र संबंधितावर कारवाई न झाल्याने पवन सातपुते यांनी राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मुद्रांक जिल्हाधिकारी आर. एल पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पारनेरचे दुय्यम निबंधक निमसे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शिवा फुलमाळी याच्याविरूद्ध भादंवि ४२०,४६५,४६७,४६८,८२ (अ), २(ब)८३ नुसार गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर