शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

काश्मीरच्या पुष्प महोत्सवात जुळले बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 4:58 PM

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /बाळासाहेब काकडे मी आणि सुजाता वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची काश्मीरला सहल गेली होती. काश्मीरमध्येच बहरलेल्या ...

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /बाळासाहेब काकडेमी आणि सुजाता वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची काश्मीरला सहल गेली होती. काश्मीरमध्येच बहरलेल्या पुष्प महोत्सवात माझी व सुजाताची नजरा नजर झाली. अन् तेथेच आमचे बंध जुळले. त्यानंतर दोन्ही परिवाराची मान्यता घेऊन रितसर विवाह केला, असे श्रीगोंद्यातील डॉक्टर विजय भानुदास बगाडे यांनी सांगितले.डॉ. विजय भानुदास बगाडे व डॉ. सुजाता यादवराव ढोबळे यांनी २० फेब्रुवारी १९७६ रोजी आंतरजातीय विवाह केला. डॉ विजय बगाडे यांचा पारंपरिक कापड व्यवसाय आहे. त्यांना वैद्यकीय सेवेची आवड होती. त्यांना पुणे येथील एका मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. त्याच कॉलेजला मुंबईच्या सुजाता यांनीही प्रवेश घेतला होता. सुजाता या अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव तापट होता, तर विजय हे अतिशय शांत, संयमी स्वभावाचे होते. पदवीचे शिक्षण अंतिम टप्प्यात असताना सर्वांना करिअरचे वेध लागले होते. दरम्यान, त्यांची रेल्वेने काश्मीरला सहल गेली होती. त्यावेळी विजय बगाडे यांच्याही मनात सुजाता यांच्याविषयी आपलुकी होती. त्यांच्याविषयी प्रेम होते. मात्र ते व्यक्त केलेले नव्हते. सुजाता यांनाही विजय यांचा स्वभाव भावलेला होता. मात्र दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नव्हते. काश्मिरी पुष्प महोत्सवात दोघांनीही एकमेकांच्या भावना बोलून दाखविल्या व त्यांनी पुढील आयुष्यात सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांनीही हा निर्णय घरी सांगितला. आंतरजातीय विवाहाला घरच्यांकडून थोडासा विरोध झाला. मात्र त्यांनी समजून सांगिल्यानंतर त्यांचा पुण्यात रितसर विवाह झाला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंद्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यानंतर सन १९७९ मध्ये पल्लवी या मुलीचा जन्म झाला. तीनेही वैद्यकीय व्यवसाय निवडला. ती एमडी झाली असून इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा करीत आहे.डॉ. बगाडे म्हणाले, सध्या चित्रपट पाहून अल्पवयीन मुले प्रेमाच्या नावाखाली आयुष्य बरबाद करून घेत आहेत. मात्र अगोदर स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आयुष्याचा जोडीदार निवडताना भावनेत वाहून जाण्याऐवजी विचार करायला हवा. घरच्यांच्या भावनांचाही विचार करावा आणि निवडलेल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट