शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बांधकाम व्यावसायिकांचा सिमेंट खरेदीवर बहिष्कार

By admin | Published: July 14, 2014 10:56 PM

अहमदनगर: सिमेंटच्या गोणीमागे जवळपास १०० रुपये दरवाढ झाली असून ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्या

अहमदनगर: सिमेंटच्या गोणीमागे जवळपास १०० रुपये दरवाढ झाली असून ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती क्रीडाईचे अध्यक्ष जवाहर मुथा यांनी दिली. सिमेंट कंपन्यांनी कार्टेल करून ही दरवाढ केल्याचे बांधकाम संघटनेचे म्हणणे आहे. अचानक झालेल्या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. ज्या कंपन्या दरवाढ मागे घेणार नाहीत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची दरवाढ केलेली नसताना आणि पावसाळ्यात सिमेंट व्यवसायावर मंदी असतानाही कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सिमेंट दरवाढीने बांधकामाचे दर प्रति चौरस फूट १०० रुपयाने वाढणार आहेत. त्यामुळे घरखरेदीचे दर वाढतील. १५ ते २८ जुलै या काळात बिल्डर्स असोसिएशन, क्रीडाई, आर्किटेक्ट आणि प्रमोटर्स बिल्डर्स संघटनेने खरेदी थांबविण्याचा निर्णय घेतला. या काळात कुणीही सिमेंट खरेदी करू नये असे आवाहन जवाहर मुथा, इकबाल सय्यद, रमेश छाजेड, अनिल मुरकुटे यांनी केले आहे. या काळात सिमेंट कंपन्यांनी दरवाढ मागे घेतली नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे मुथा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नगर शहरात दरमहा ५० हजार तर जिल्ह्यात २ लाख सिमेंट गोण्यांची विक्री होते. सिमेंट खरेदीवर बहिष्कार टाकल्याने बांधकामे अर्धवट पडण्याचा धोका आहे.