आराेग्य विभागाच्या परीक्षेत सापडला बोगस परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:28+5:302021-03-01T04:25:28+5:30

संदीप साहेबसिंग बिघोत (वय २५, रा. जवखेड, ता. कन्नल, जि. औरंगाबाद), केसरसिंग स्वरूपचंद सिंगल (वय २१) व धरमसिंग प्रेमसिंग ...

A bogus examinee was found in the health department exam | आराेग्य विभागाच्या परीक्षेत सापडला बोगस परीक्षार्थी

आराेग्य विभागाच्या परीक्षेत सापडला बोगस परीक्षार्थी

Next

संदीप साहेबसिंग बिघोत (वय २५, रा. जवखेड, ता. कन्नल, जि. औरंगाबाद), केसरसिंग स्वरूपचंद सिंगल (वय २१) व धरमसिंग प्रेमसिंग सतवन (वय ३८, रा. दोघे गोकुळवाडी, ता. जाफराबाद, जि. जालना) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील केसरसिंग सिंगल हा मूळ परीक्षार्थी होता, तर त्याच्या जागेवर डमी म्हणून संदीप बिघोत हा परीक्षा देताना सापडला. बिघोत याला धरमसिंग सतवन हा केंद्राच्या बाहेर थांबून मदत करत होता.

शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात आरोग्य विभागाच्या गट क संवर्गासाठी रविवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत परीक्षा सुरू होती. जिंजर वेब्ज कंपनीकडून ही परीक्षा घेतली जात होती. परीक्षा सुरू असताना केंद्रातील पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांना ब्लॉक क्रमांक तीनमध्ये परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला. याबाबत केंद्राच्या पर्यवेक्षक अपर्णा क्षीरसागर यांनी या परीक्षेचे जिल्हा समन्वयक रितेश रमेश गायकवाड यांना माहिती दिली. पर्यवेक्षकांनी सदर विद्यार्थ्याची चौकशी केली तेव्हा त्याचे नाव संदीप बिघोत असल्याचे समोर आले तसेच तो केसरसिंग सिंगल याचा डमी म्हणून परीक्षा देत असल्याचेही समोर आले. याबाबत तोफखाना पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोळंके, सुरवसे, पिंगळे आदींच्या पथकाने बिघोत याला ताब्यात घेतले. त्यानंतर केंद्र परिसरातून सिंगल व सतवन यांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी परीक्षा समन्वयक रितेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....................

मोबाईलमध्ये काढले होते प्रश्नपत्रिकेचे फोटो

डमी परीक्षार्थी बिघोत याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे मोबाईल, सीमकार्ड, चार्जिंग स्लॉट, ईअर पिस असे साहित्य आढळून आले तसेच मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेच्या पानाचे २५ फोटो आढळून आले. हे फोटो केंद्राबाहेर असलेल्या दोघांना पाठवून त्यांच्याद्वारे प्रश्नाचे उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न होता. मात्र, पर्यवेक्षकाच्या तपासणीत हा प्रकार समोर आला.

..................

फोटो २८ आरोपी

ओळी- नगर शहरातील परीक्षा केंद्रावरून तोफखाना पोलिसांनी बोगस परीक्षार्थीसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना अटक केली.

Web Title: A bogus examinee was found in the health department exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.