The body of an unknown Isma was found; Two suspects were taken into custody | अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; दोन संशयित घेतले ताब्यात

अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; दोन संशयित घेतले ताब्यात

घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत खंदरमाळवाडीच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून त्याच्या अंगात निळसर राखाडी रंगाची फूल पॅन्ट, शर्ट फिक्कट गुलाबी, प्लास्टिक काळी चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या डोक्याला व छातीला मार असून प्राथमिक अंदाजानुसार खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला.

Web Title: The body of an unknown Isma was found; Two suspects were taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.