बोधेगावच्या भूमिपुत्राची उच्च शिक्षणासाठी ‘जर्मनी वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:20 AM2021-04-09T04:20:45+5:302021-04-09T04:20:45+5:30

बोधेगाव (ता.शेवगाव) येथील किशोर राम रूपनर (वय २७) हा सामान्य कुटुंबातील युवक मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड इंजिनिअरिंग या ...

Bhumiputra of Bodhegaon ‘Germany Wari’ for higher education | बोधेगावच्या भूमिपुत्राची उच्च शिक्षणासाठी ‘जर्मनी वारी

बोधेगावच्या भूमिपुत्राची उच्च शिक्षणासाठी ‘जर्मनी वारी

Next

बोधेगाव (ता.शेवगाव) येथील किशोर राम रूपनर (वय २७) हा सामान्य कुटुंबातील युवक मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड इंजिनिअरिंग या पदवी अभ्यासक्रमासाठी जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन येथे जात आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने औरंगाबाद येथील महाविद्यालयात बी.ई. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. तर पुढील उच्चशिक्षण जर्मनी येथे जाऊन त्याठिकाणीच जाॅब करून मिळवायचे, असा त्याचा मानस आहे. त्याप्रमाणे त्याने जर्मनीला जाण्यासाठी आवश्यक असणारी खडतर अशी भाषिक व इतर पात्रता चाचणी मोठ्या मेहनतीने उत्तीर्ण केली. वडील राम रूपनर हे गावातीलच एका हाॅटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. तर आई इंदुबाई रूपनर या घरचीच शेतीकामे करून संसाराचा गाडा चालवतात. किशोरला शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत त्यांनी मोठ्या कष्टाने उभारून त्यास वेळोवेळी पुरवली. मेहुणे राजेंद्र हंडाळ यांचेही त्यास सहकार्य लाभले. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा स्वकर्तृत्वाने शिक्षण घेण्यास परदेशी जात आहे. ही बाब गावासाठी भूषणावह असल्याने ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

त्यास शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसरपंच कैलास अंधारे, अनिल कांबळे, महादेव घोरतळे, मयूर हूंडेकरी, सुनील घोरतळे, दत्तात्रय शहाणे, गणेश घोरतळे, प्रमोद तांबे, विठ्ठल रूपनर, वेताळा रूपनर, अनिल डेरे, विजय कानडे, अनिल रूपनर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सम्राट प्रतिष्ठानने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो आहे

Web Title: Bhumiputra of Bodhegaon ‘Germany Wari’ for higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.