शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

भिंगारला वर्षानुवर्षे लष्करी कोट्यातूनच मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:12 PM

भिंगार कॅन्टोन्मेंटला लष्करी क्षेत्राच्या कोट्यातून पाणी दिले जाते. पण पूर्वी रोज येणारे पाणी आता दिवसाआड येत आहे. तेही कमी दाबाने येते. यामुळे येथील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

पाण्यासाठी फरपट / अनिकेत यादव । भिंगार (अहमदनगर) : नगरच्या भिंगार उपनगरातील नागरी वस्तीसह लष्करी आस्थापना व लष्करी निवासस्थानांना मुळा धरणातून पाणी पुरवठा होतो. अहमदनगर एमआयडीसीसाठीच्या पाणीपुरवठा पाइपलाइनद्वारे हा पुरवठा होतो. भिंगार कॅन्टोन्मेंटला लष्करी क्षेत्राच्या कोट्यातून पाणी दिले जाते. पण पूर्वी रोज येणारे पाणी आता दिवसाआड येत आहे. तेही कमी दाबाने येते. यामुळे येथील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. भिंगार शहरात बºयाच वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी नागरिक व राजकीय पक्षांनी या आधीही अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढले. तरीही पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. लष्करी विभागाचा मुळा डॅमसोबत ४० लाख गॅलन रोज असा करार आहे. परंतु मुळा डॅमकडून लष्करी विभागाला रोज २२ लाख गॅलन पाणी मिळते. यातून लष्कराचा भिंगार कॅन्टोन्मेंटशी रोज ३ लाख गॅलनचा करार आहे. परंतु कॅन्टोन्मेंटला रोज २ लाख गॅलनच पाणी मिळते. यातून २२ पैकी लष्करी विभागाला २० लाख गॅलनचा रोज पाणी पुरवठा होतो. त्यांनाही तो अपुरा पडत आहे. जेव्हा पूर्ण क्षमतेने मुळा डॅमकडून लष्करी विभागाला पाणी पुरवठा होईल. तेव्हाच कॅन्टोन्मेंटच्याही पाणी पुरवठ्यात वाढ होईल. परंतु तसे होत नाही. यातून कॅन्टोन्मेंट व लष्करी विभागाला व्यापारी दराने पाण्याचा दर लावला जात आहे. भिंगारकरांना या पाण्यासाठी मोठी पाणीपट्टी भरावी लागते. पाणीपट्टी व्यापारी पध्दतीने आकारली जात आहे. यामुळेही भिंगारकर त्रस्त आहेत. पाणीपट्टी भरुनही भिंगारकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तर भिंगारकरांची तहान कशी भागणार? असा सवाल आहे.९६ लाखांची पाणीपट्टी; वसुली मात्र ३० लाखच पाणीपट्टी पोटी कॅन्टोन्मेंटला वर्षाला ९६ लाख मीटरप्रमाणे बिल येते. तर कॅन्टोन्मेंट रहिवासी नागरिकांकडून ३० लाखांचाच खर्च वसूल होतो. ५६ लाख केंद्र सरकार भरते.  तरीही कॅन्टोन्मेंट रहिवासी म्हणतात की, आम्हाला पाणीपट्टी खूप जास्त आहे. तरीही कॅन्टोन्मेंट रहिवाशांना आमचा जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे, असे कॅन्टोन्मेंटचे पाणी पुरवठा विभाग अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर