शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समित्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 7:53 PM

खासदार राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याच्या आयोजनासाठी गठीत केलेल्या राष्ट्रीय समित्यांवर माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

संगमनेर : खासदार राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याच्या आयोजनासाठी गठीत केलेल्या पक्षाच्या विविध राष्ट्रीय समित्यांवर माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.काँग्रेसचे मुख्य सचिव जनार्दन द्विवेदी यांनी या निवडी जाहीर केल्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीत ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी, मुकुल वासनिक, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, आमदार बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह, खासदार अहमद पटेल, अशोक गहलोत, शशी थरूर, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव याच्यासह वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेखालील कृषी, रोजगार व गरिबी निर्मूलन समितीत मिनाक्षी नटराजन, आमदार बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस छाननी समितीच्या अध्यक्षपदी, हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस विधिमंडळ समितीच्या निरीक्षकपदी, महाराष्ट्र विधान भवनाच्या राष्ट्रकुल संसदीय शिष्टमंडळाच्या अध्यक्षपदीही थोरात यांची यापूर्वी निवड करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समित्यांमधील आमदार थोरात यांच्या निवडीचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरात