कोरोनाचे संकट टळो, चरणांचे दर्शन घडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:18 AM2021-07-25T04:18:35+5:302021-07-25T04:18:35+5:30

यानिमित्ताने साई प्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें. यर्लगड्डा ...

Avoid the corona crisis, let the steps appear | कोरोनाचे संकट टळो, चरणांचे दर्शन घडो

कोरोनाचे संकट टळो, चरणांचे दर्शन घडो

Next

यानिमित्ताने साई प्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें. यर्लगड्डा यांनी पोथी, सीईओ कान्हुराज बगाटे यांनी वीणा, तर डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी मालदिया यर्लगड्डा, संगीता बगाटे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी आदी उपस्थित होते. सुधाकर वें. यर्लगड्डा व मालदिया यर्लगड्डा यांच्या हस्ते सकाळी श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला.

..........................

लेझर शो यंदाचे आकर्षण

स्थानिक तरुण कारागिरांनी निर्माण केलेला लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरला. विशेष म्हणजे साई संस्थानसाठी हा शो विनामूल्य निर्माण करण्यात आला. परमनंट लेझर शो निर्मितीसाठी साई संस्थानमध्ये गेल्या एक तपापासून प्रस्तावित आहे. येथील समर्थ इलेक्ट्रिकचे सुनील बारहाते यांनी महाद्वार चारसमोर एक पारदर्शी पडदा लावून त्यावर लेझर शोची निर्मिती केली आहे. यात नीलेश बारहाते, योगेश बारहाते, रोहित गायकवाड, प्रवीण गवांदे, अशोक गाडेकर, संतोष दुधाट, शंकर खरात, भीमराज खंडीझोड, आकाश पाळंदे, दीनदयाळ वर्मा, प्रसाद वर्पे, साईनाथ शिंदे, सनी तुरकणे, नितीकेश थेटे, रामेश्वर मोरे, नीलेश आहिरे व जगदीश साळवे या तरुणांनी परिश्रम घेतले. अमेरिका येथील महिला साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून साईमंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

..................

शेतजमीन संस्थानला देणगी

गुरू पौर्णिमा उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर मंदिराचे पुजारी दिलीप सुलाखे यांच्‍या पत्‍नी मंजू सुलाखे यांनी शेतजमीन साई संस्थानला देणगी स्वरूपात दिली. राहाता तालुक्यातील रुई येथील १ एकर शेतजमीन साई संस्‍थानला देणगी स्‍वरूपात दिली.

Web Title: Avoid the corona crisis, let the steps appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.