विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 06:16 PM2018-04-12T18:16:35+5:302018-04-12T18:16:35+5:30

नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मॅकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात तयार केलेल्या व वापरण्यास सोपे असलेल्या स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे.

The automated device of the onion harvesting made by the students | विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र

विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र

Next
ठळक मुद्देछत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे यश

अहमदनगर : नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मॅकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात तयार केलेल्या व वापरण्यास सोपे असलेल्या स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे.
जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी (मध्य प्रदेश) यांनी आयोजित केलेल्या बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड २०१८ या स्पर्धेची दुसरी फेरी जी. एच. रायसोनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट, पुणे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यात त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कांदा काढणीयंत्र हा प्रकल्प सादर केला होता. सध्याच्या काळात कांदा काढणी यंत्राची अनुपलब्धता व शेतक-यांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थी प्रमोद वांढेकर, राहुल श्रीवास्तव, प्रणव दातीर, सुहास पाटसकर व प्रतीक बांड यांनी सर्वसामान्य शेतक-यांना परवडेल व सहजरित्या कोणत्याही ट्रॅक्टरला जोडता येईल असे कांदा काढणीयंत्र तयार केले आहे. या स्पर्धेत एकूण १२५ प्रकल्प सादर करण्यात आले होते. यात छत्रपती अभियांत्रिकीने द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेची तिसरी फेरी जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी हा प्रकल्प सादर करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे, यांत्रिक विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. पी. नगरकर, प्रकल्प मार्गदर्शक प्रा.एच. बी. पवार व सर्व यांत्रिक विभागाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

काढणी यंत्राचे फायदे
वेळेची बचत, कोणत्याही ट्रॅक्टरला सहजपणे जोडणी शक्य.
कांदा, बीट, लसूण, बटाटा आदी पिकांची काढणी शक्य.
मजुरांची गरज नाही.
एक एकर कांदा काढणीसाठी ३-४ तासांचा वेळ.

 

Web Title: The automated device of the onion harvesting made by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.