हिवरगाव पठार येथे कांदे चोरीचा प्रयत्न फसला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:19 PM2019-12-04T12:19:59+5:302019-12-04T12:20:23+5:30

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार येथे शेतात साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरून गोण्यांमध्ये भरला. परंतु शेतक-याला जाग आल्याने चोरट्यांनी या गोण्या तेथेच टाकून पळ काढल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. 

Attempts to steal onions at Hivargaon Plateau failed | हिवरगाव पठार येथे कांदे चोरीचा प्रयत्न फसला  

हिवरगाव पठार येथे कांदे चोरीचा प्रयत्न फसला  

Next

घारगाव : कांद्याला सफरचंदाचा भाव आल्याने चोरट्यांनी आता कांदे देखील चोरण्यास सुरवात केली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार येथे शेतात साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरून गोण्यांमध्ये भरला. परंतु शेतक-याला जाग आल्याने चोरट्यांनी या गोण्या तेथेच टाकून पळ काढल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. 
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील हिवरगाव पठार येथील शेतकरी संतोष दराडे यांची डोंगरालगत शेतजमीन आहे. या शेतातच त्यांनी काही प्रमाणात कांदा साठविलेला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हा कांदा चोरला. त्यानंतर तो गोण्यांमध्ये भरून साठविलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर गोण्या नेवून ठेवल्या. पुन्हा दुसºया ठिकाणी साठविलेला कांदा चोरट्यांनी चोरण्यास सुरवात केली. हा प्रकार सुरू असताना दराडे यांना जाग आली असता त्यांना साठविलेल्या कांद्याजवळ काही जण दिसले. त्यांनी लगेचच कामगारांना जागे करत आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यानंतर कांद्याजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींनी पळ काढला. दराडे यांना चोर असल्याची खात्री झाली. त्यांनी विजेरीच्या प्रकाशात पाहिले असता कांदे चोरणारे सात ते आठ चोरटे त्यांना दिसले. पुढे काही अंतरावर त्यांनी जावून पाहिले असता सुमारे तीस गोण्यांमध्ये चोरट्यांनी चोरलेला कांदा भरून ठेवला होता. तेथेच कांदा भरण्यासाठी वापरात येणारे गोण्या, सुतळी आदी साहित्य पडलेले होते. चोरटे कांदा चोरत असताना दराडे यांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने शेतमालाची चोरी टळली. दरम्यान बाजारात कांद्याला सध्या प्रतिकिलो १०० ते १५० रुपये भाव मिळतो आहे. यापूर्वी देखील पठारभागात कांदे चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कांदा साठविलेल्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना आता कांद्याला राखण बसण्याची वेळ आली आहे.
 

Web Title: Attempts to steal onions at Hivargaon Plateau failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.